३ मे : जागतिक हास्य दिन हसाल तर जगाल!

By admin | Published: May 3, 2015 05:34 AM2015-05-03T05:34:47+5:302015-05-03T05:34:47+5:30

दिवसाचे चोवीस तास काबाडकष्ट करीत दगदगीचे आयुष्य व्यतीत करणारा मुंबईकर जणूकाही हसण्याचेच विसरून गेला आहे.

May 3: World comedy day will be alive! | ३ मे : जागतिक हास्य दिन हसाल तर जगाल!

३ मे : जागतिक हास्य दिन हसाल तर जगाल!

Next

मुंबई : दिवसाचे चोवीस तास काबाडकष्ट करीत दगदगीचे आयुष्य व्यतीत करणारा मुंबईकर जणूकाही हसण्याचेच विसरून गेला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या दररोजच्या रुटीन जोकवर अगदी जिवावर येईल असे हसण्याइतपत राहिलेल्या मुंबईकरांनी मोकळ्या आकाशाखालीही खळखळून हसावे आणि जगावे, यासाठी ‘लोकमत’ने खास जागतिक हास्य दिनाचे औचित्य साधत ‘लाफ्टर क्लब’च्या कार्याचा घेतलेला हा आढावा.
१३ मे १९९५ रोजी डॉ. मदन कटारिया यांनी अंधेरीच्या लोखंडवाला संकुल परिसरात लाफ्टर क्लबची स्थापना केली. तेव्हा ही संकल्पना लोकांना फारशी रुचली नाही. काही वर्षे लाफ्टर क्लब उच्चभ्रू लोकांपुरताच मर्यादित राहिला. २००० सालानंतर मात्र लाफ्टर क्लबचे जाळे मुंबईत सर्वत्र पसरले. आज पूर्व उपनगरांच्या तुलनेत शहर आणि पश्चिम उपनगरांत लाफ्टर क्लब आहेत. हे सर्व करताना लाफ्टर क्लबचे जनक डॉ. मदन कटारिया यांचे सहकारी आत्माराम तोरणे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. तोरणे सांगतात की, एक वर्षापूर्वी ७० देशांत तब्बल १० हजार लाफ्टर क्लब होते. आजघडीला जगभरातील १०१ देशांत १२ हजारांहून अधिक लाफ्टर क्लब आहेत.

Web Title: May 3: World comedy day will be alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.