Chhagan Bhujbal: 'कदाचित मंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल', भुजबळांचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 03:00 PM2021-09-17T15:00:41+5:302021-09-17T15:01:40+5:30

Chhagan Bhujbal: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आयोजित औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाजपा नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख करुन सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे.

Maybe Minister Raosaheb Danve wants to join Shiv Sena says chhagan bhujbal | Chhagan Bhujbal: 'कदाचित मंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल', भुजबळांचा टोमणा

Chhagan Bhujbal: 'कदाचित मंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल', भुजबळांचा टोमणा

Next

Chhagan Bhujbal: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आयोजित औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाजपा नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख करुन सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे. या कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थितीत होते. राज्याच्या राजकारणात यामुळे चर्चांना उधाण आलं असून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं असता त्यांनी रावसाहेब दानवे यांना टोला लागवला आहे. रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर? असं म्हणत भुजबळांनी फिरकी घेतली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

भाजपा-सेना एकत्र आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी चालतील का?, रावसाहेब दानवे म्हणाले...

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, "चांगली गोष्ट आहे. राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर?"

मुख्यमंत्री ठाकरे भर सभेत माझ्या कानात म्हणाले, 'काँग्रेसवाले खूप त्रास देतात... आपण बसून बोलू'; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा

फडणवीसांच्या विधानाचा घेतला समाचार
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत असलेल्या त्रासामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपाला भावी सहकारी म्हटलं असेल असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीसांच्या या विधानाचाही भुजबळांनी समाचार घेतला. "फडणवीसांच्या विधानाशी मी सहमत नाही. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. उलट मागील पाच वर्ष भाजपाने शिवसेनेला कशी वागणूक दिली हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यावर काही बोलण्याची मला गरज वाटत नाही. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला दिलेलं मंत्रीपद आणि केलेली अवहेलना देखील आपण पाहिली आहे", भुजबळ म्हणाले. 

Web Title: Maybe Minister Raosaheb Danve wants to join Shiv Sena says chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.