महापौर बंगल्यातशेवटची गुढी

By admin | Published: March 29, 2017 06:14 AM2017-03-29T06:14:54+5:302017-03-29T06:14:54+5:30

पुरातन वास्तू असल्यामुळे मुंबईतील प्रमुख आकर्षक स्थळांपैकी एक असलेल्या दादर पश्चिम येथील ऐतिहासिक महापौर बंगला

Mayor of bungalow | महापौर बंगल्यातशेवटची गुढी

महापौर बंगल्यातशेवटची गुढी

Next

मुंबई : पुरातन वास्तू असल्यामुळे मुंबईतील प्रमुख आकर्षक स्थळांपैकी एक असलेल्या दादर पश्चिम येथील ऐतिहासिक महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे या बंगल्यात मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज उभारलेली गुढी शेवटची ठरणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. मात्र यासाठी योग्य जागा मिळत नसल्याने स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने दादर, शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची निवड केली. मात्र हा बंगला ३० वर्षांच्या मक्त्याने देण्यात येणार असल्याने महापौरांचे निवासस्थान येथून हलविण्यात येणार आहे.
भायखळा येथील राणीच्या बागेतला बंगला महापौरांच्या निवासासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे या बंगल्यातला महापौरांचा हा शेवटचा गुढीपाडवा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर बंगल्यावर गुढीचे आज सपत्नीक पूजन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Mayor of bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.