महापौरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:49 AM2017-09-01T01:49:14+5:302017-09-01T01:49:41+5:30
मुंबईत झालेल्या अतिवृष्टीत जीव गमवावा लागलेल्या मुंबईकरांच्या खुनाच्या आरोपाखाली महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजय मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
मुंबई : मुंबईत झालेल्या अतिवृष्टीत जीव गमवावा लागलेल्या मुंबईकरांच्या खुनाच्या आरोपाखाली महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजय मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांडपाणी नालेसफाईचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्याबदल्यात मुंबईकरांच्या खिशातून कोट्यवधी रुपयांच्या कराची आकारणी केली जाते. मात्र दरवर्षी पावसामुळे मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागते. शिवाय अनेक मुंबईकरांना जिवाला मुकावे लागते. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे २१ जणांना जीव गमवावा लागला, तर ४० लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे
यासंदर्भात हलगर्जी करणा-या व दोषी असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पोलिसांत आयुक्त आणि महापौरांविरोधात थेट तक्रार
नोंदवता येत नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक आहे. म्हणूनच अतिवृष्टीच्या
काळात नियोजन करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका प्रमुख म्हणून महापौर आणि आयुक्तांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी,
म्हणून मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवलेली आहे. या नोटीसला ७ दिवसांत
उत्तर मिळाले नाही, तर
उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.