रस्त्यावरील खड्यांवरुन महापौरांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:11 PM2020-08-19T17:11:18+5:302020-08-19T17:12:17+5:30
रस्त्यावरील खड्यांच्या मुद्यावरुन महापालिका आयुक्तांनी अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरले असतांनाच आता महापौर नरेश म्हस्के यांनी देखील शहरातील खड्यांवरुन संबधीत विभागाच्या अधिकाºयांची चांगलीच खरडपटटी काढल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे : मागील काही दिवसापासून शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. सोशल मिडीयावर तर शहरातील खड्यांवरील कविता हिट झाली आहे. सतत होणाºया या टिकेनंतर महापौर नरेश म्हस्के यांनी संबधींत विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. कोरोना संकटाशी सामना करुन हा आजार रोखण्यात पालिकेने निश्चितच यश मिळविले आहे. परंतु खड्यांच्या टिकेमुळे सत्ताधाºयांसह महापालिकेचीही बदनामी होत असल्याचे खडे बोल त्यांनी अधिकाºयांना सुनावले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खड्डे बुजविण्याच्या कामात निष्काळजीपणा करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
बुधवारी सांयकाळी ४ च्या सुमारास महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना शहरातील खड्यांविषयीची माहिती घेण्यासाठी बोलावले होते. यावेळेस त्यांनी अधिकाºयांची चांगलीच खरडपटटी काढल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनाही निवेदन देऊन खड्यांवरुन महापालिकेची बदनामी होत असल्याचे सांगितले आहे. कोरोनाचे सावट सर्वत्रच आहे. महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चितप्रकारे महापालिकेने विविध योजना राबवून व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या वेळोवेळी मिळणाºया सूचनांनुसार केल्याने ठाण्यातील कोरोनाची सद्यस्थिती आटोक्यात आली आहे. दुसरीकडे रस्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे नाहक महापालिकेला बदनामीला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मुलभूत सेवासुविधा नागरिकांना देणे आवश्यक आहे. परंतु कोरोनाच्या काळात रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना खड्डयांचा त्रास सहन करावा लागत आहे. योग्यवेळी खड्डे न बुजविल्यामुळे नागरिक महापालिकेला दोष देत आहेत व याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. पावसाळा व या काळामध्ये रस्त्यांवर पडणारे खड्डे हा दरवर्षीचा विषय आहे. तरी देखील संबंधित अधिकाºयांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मी महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डयांबाबत योग्य नियोजन व कारवाई करण्यात यावी यासंदर्भात मी बैठक घेवून संबंधितांना निर्देश दिले होते. त्याचबरोबर वेळोवेळी दूरध्वनीवरु न देखील संबंधितांशी चर्चा करु न सूचना दिलेल्या आहेत. तरी देखील जाणूनबुजून वर्तमानपत्रामध्ये वृत्त प्रसिद्ध होईल किंबहुना विरोधकांनी टिकेची झोड उठविल्यावर काम करायचे अशीच भूमिका संबंधितांची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरील खड्डे हे वर्षानुवर्षाचे काम असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबाबत संबंधित अधिकाºयांची सखोल चौकशी करु न त्यांच्यावर महापालिकेची बदनामी झाल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात यावी. शहरातील उड्डाणपुलांवर पडलेले खड्डे बुजविणे हे काम महापालिकेच्या अखत्यारित येत नसले तरी संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा करु न काम करु न घ्यावे अशी सुचनाही त्यांनी केली. किंबहुना ठाणेकरांची होणारी गैरसोय लक्षात घेवून प्रसंगी अनेकवेळा महापालिकेने अशी कामे स्वत:हून केलेली आहेत असे असताना देखील सद्यस्थितीत एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम अधिकारी करीत आहेत का? परिणामी अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे महापालिकेची बदनामी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
चार दिवसांवर गणेशोत्सव आला असून महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते सुस्थितीत करण्याबाबत याबाबत लेखी पत्र यापूर्वी दिले आहे. ठाण्यातील नागरिकांना निर्विघ्नपणे व भयमुक्त गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी तातडीने रस्ते दुरूस्त करण्याबाबत आपण स्वत: जातीने लक्ष घालून कार्यवाही करावी असेही त्यांनी सुचित केले.