- मनोहर कुंभेजकर
मुंबई- येत्या 25 जून रोजी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर या विधानपरिषदेच्या दोन्ही निवडणुकीत शिक्षक मतदार संघातून प्रा.शिवाजी शेंडगे आणि पदवीधर मतदार संघातून विभागक्रमांक 1 चे विभागप्रमुख विलास उर्फ भाई पोतनीस यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. गेल्या सोमवारी सायंकाळी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा येथे या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली होती.यावेळी शिवसेना जिकण्यासाठीच निवडुक लढवत असून मुंबई,कोकण,नाशिक येथील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक जिकणार म्हणजे जिकणारच असा ठाम विश्वास त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला होता.यावेळी शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न शिवसेना आवर्जून सोडवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती.आता मुंबई शिक्षक,पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उडी घेतली असून या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी महापौरांनी कंबर कसली आहे.एकीकडे मुंबईकरांना पावसात त्रास होऊ नये यासाठी गेल्या आठवड्यात मुंबई पडलेल्या मुसळधार पावसात महापौर रस्त्यावर उतरले होते.आपल्या दैनंदिन व्यस्त कार्यक्रमात आता महापौरांनी देखिल या दोन्ही निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
शिवसेना विभाग क्र ४ व ५ ची मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या विजयासाठी रणनिती"मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघातुन पक्षाचे प्रतिनीधी निवडून जावेत म्हणून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे विधानपरिषदेतील गटप्रमुख व विभागप्रमुख अँड.अनिल परब यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. अँड परब यांनी स्वतःच्या अधिपत्याखालील विभागातून जास्तीत जास्त मते पक्षाच्या उमेदवारास मिळावी म्हणून विभागातील पदाधिका-यांना कानमंत्र देण्यासाठी एक बैठक काल रात्री जेव्हीपिडीच्या ऋतुंबरा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती.यावेळी महापौरांनी मत मांडलं. वांद्रे पूर्व गोळीबार येथील संभाजी महाराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे प्रिन्सिपल असलेल्या माझ्या सारख्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे महापौर हे सन्मानाचे पद दिले.शिक्षक मतदार संघाचा आमदार शिक्षक असेल तर तो शिक्षकांचे प्रश्न त्याला अवगत असल्यामुळे तो चांगल्या प्रकारे विधानपरिषदेत मांडू शकतो.त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी प्रा.शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे.तसेच शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत कार्यरत असलेल्या आणि शाखाप्रमुख ते विभागप्रमुख असा प्रवास करणारे विलास पोतनीस हे अनुभवी आणि एम अर्थशास्त्र असे उच्च शिक्षित आहे.एकीकडे रिझर्व्ह बँकेत 35 वर्ष नोकरी करतांना स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.त्यामुळे शिक्षकांचे आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुंबईतील तमाम शिक्षक मतदारांनी आपले एक शिक्षकाचे आणि दुसरे पदवीधर अशी दोन मते प्रा.शिवाजी शेंडगे आणि विलास पोतनीस यांना द्यावीत आणि मगच कामावर जावे असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.