महापौर किशोरी पेडणेकर यांना ‘राष्ट्रप्रेरणा’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:06 AM2020-12-23T04:06:07+5:302020-12-23T04:06:07+5:30
मुंबई : इंदूर (मध्य प्रदेश) येथील वैकल्पिक चिकित्सा पद्धती विकास संस्था आणि वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डस् यांच्या संयुक्त ...
मुंबई : इंदूर (मध्य प्रदेश) येथील वैकल्पिक चिकित्सा पद्धती विकास संस्था आणि वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डस् यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना यंदाच्या ‘राष्ट्रप्रेरणा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजसेवेमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या संस्थेमार्फत ‘आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय परिषद - २०२०’चे आयोजन इंदूर येथे करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या देशभरातील निवडक मान्यवरांना राष्ट्रप्रेरणा पुरस्कार - २०२० घोषित करण्यात आले हाेते. उल्लेखनीय वैयक्तिक कामगिरी, राष्ट्रीय कार्यामध्ये अतुलनीय योगदान आणि सामाजिक कार्याबद्दल यंदाचा राष्ट्रप्रेरणा पुरस्कार या वेळी महापौर पेडणेकर यांना देण्यात आला.
पूर्वाश्रमीच्या परिचारिका म्हणून गाठीशी असलेला अनुभव व राजकीय कारकिर्दीतून प्राप्त प्रशासकीय कौशल्य यांचा मेळ साधून महापौर पेडणेकर यांनी आपला ठसा उमटविला. राष्ट्रप्रेरणा पुरस्कार प्रदान करताना महापौरांच्या या संपूर्ण कार्याचे कौतुक आयोजकांनी केले.
.........................