Join us

महापौर राजीनामा द्या!

By admin | Published: April 08, 2015 3:40 AM

निधी वाटपावरील वादग्रस्त आॅडिओ क्लिप प्रकरणी स्नेहल आंबेकर यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी काँग्रेसने आज

मुंबई : निधी वाटपावरील वादग्रस्त आॅडिओ क्लिप प्रकरणी स्नेहल आंबेकर यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी काँग्रेसने आज लावून धरली़ यावर सावध भूमिका घेत विरोधी पक्षाला फैलावर घेणाऱ्या भाजपाने महापौरांच्या चौकशीला मात्र समर्थन दिले़ मात्र दीड तासाच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांनंतरही कोणतेही स्पष्टीकरण न देता काँग्रेसची मागणी फेटाळून लावत महापौरांनी आपल्या मनमानी कारभाराचे दर्शन घडविले़विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिकेच्या महासभेत निवेदन करीत वादग्रस्त आंबेकर यांना महापौरपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे मत व्यक्त केले़ मात्र काँग्रेसच्या या हल्ल्याचा सामना करण्यासाठी भाजपाला मोर्चा सांभाळावा लागला़ भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळ्यांचा पाढा वाचला़ परंतु आॅडिओ क्लिप प्रकरणाची शहानिशा करण्याची मागणी करीत त्यांनी शिवसेनेची कोंडी केली़ राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, समाजवादीचे रईस शेख यांनी सभागृह चालविण्याच्या महापौरांच्या पद्धतीवर टीकेची झोड उठवली़ परंतु महापौरांच्या राजीनाम्याचे प्रत्यक्ष समर्थन केले नाही़ अखेर चर्चा महागात पडण्याची चिन्हे दिसताच महापौरांनी विरोधी सदस्यांना बोलण्याची संधी नाकारून सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना पुढे केले़ मात्र स्पष्टीकरण देण्यासाठी शेवटपर्यंत त्या राजी नव्हत्या़ अखेर यावर विरोधी पक्षांचा गोंधळ सुरू होताच, आपल्यावरील सर्व आरोप खोटे असून महापौरपदाची प्रतिष्ठा आपल्याला ज्ञात असल्याचे उडवाउडवीचे उत्तर देत महापौरांनी काँग्रेसची मागणी फेटाळली़ यामुळे संतप्त काँग्रेसने घोषणाबाजी करीत महापौरांचा निषेध केला़ (प्रतिनिधी)