माझगाव गोदी : वर्षभर चालणार सागरी परीक्षण

By admin | Published: October 30, 2015 01:07 AM2015-10-30T01:07:32+5:302015-10-30T01:07:32+5:30

स्कॉर्पियन श्रेणीतील कलवरीची लांबी २१६ फूट तर रुंदी २० फूट आहे.सुरुंग पेरणी, पाणबुडीरोधी, गोपनीय माहिती मिळवणे व टेहळणीसाठी उत्तम 533 एमएमच्या सहा टॉरपॅडो सदर पाणबुडीवर आहेत

Mazagaon Dockyard: A sea test run throughout the year | माझगाव गोदी : वर्षभर चालणार सागरी परीक्षण

माझगाव गोदी : वर्षभर चालणार सागरी परीक्षण

Next

स्कॉर्पियन श्रेणीतील कलवरीची लांबी २१६ फूट तर रुंदी २० फूट आहे.सुरुंग पेरणी, पाणबुडीरोधी, गोपनीय माहिती मिळवणे व टेहळणीसाठी उत्तम 533 एमएमच्या सहा टॉरपॅडो सदर पाणबुडीवर आहेत.शत्रूंच्या पाणबुड्यांच्या वेध घेण्यासाठी दोन क्षेपणास्त्र तैनात असतील.984 फूट समुद्रात खोल जाण्याची पाणबुडीची क्षमतामुंबई : माझगाव गोदीत सध्या सहा पाणबुड्यांची बांधणी सुरू असून, त्यापैकी ‘आयएनएस कलवरी’ या भारतीय पाणबुडीच्या जलावतरणाचा समारंभ गुरुवारी माझगाव गोदीत संपन्न झाला. पुढील वर्षभर या पाणबुडीला कठोर सागरी परीक्षणाला सामोरे जावे लागणार आहे.
त्यानंतर पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सामील होईल. फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पियन वर्गातील या पाणबुडीचे वजन तब्बल १७०० टन असून, पुढील वर्षभर तिला सागरी चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. २००५ साली भारतीय संरक्षण मंत्रालय आणि फ्रेंच कंपनी डीसीएनएस यांच्यात सदर स्कॉर्पियन वर्गातील पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी २२ हजार ७४१ कोटींचा करार झाला असून, माझगाव गोदीत त्यांची बांधणी सुरू आहे.

Web Title: Mazagaon Dockyard: A sea test run throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.