माझगाव, बीकेसी, बाेरीवलीला सर्वाधिक प्रदूषणाचा पडला विळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 05:22 AM2021-01-10T05:22:15+5:302021-01-10T05:22:52+5:30
दिल्ली, अहमदाबादला टाकले मागे
मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून मुंबईसह आसपासच्या परिसरातील वातावरण प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. धूर, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. विशेषत: दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे यात भर पडली आहे. आणखी काही दिवस मुंबई प्रदूषित राहण्याची शक्यता आहे.
एका अभ्यासाअंती पीएम २.५ (पार्टीक्युलेट मॅटर पोल्यूटंट) या कणांची पातळी सकाळच्या वेळेत सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. बीकेसी, चेंबूर, कुर्ला, खारघर, तळोजा, पनवेल येथे हवा प्रदूषित आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पीएम २.५ खूप सूक्ष्म असतात. सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. या प्रदूषकांमुळे वारंवार फुप्फुसांचा संसर्ग, दमा, दीर्घकाळ टिकणारे श्वसन संस्थेचे आजार आणि वृद्धांमध्ये हृदयविकार संभवतात. पीएम २.५ ची उच्च पातळी कमी दृश्यमानता आणि धूरक्यासही कारण ठरते. पूर्वेकडून जमिनीहून जे वारे येत आहेत त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले. दक्षिण पूर्वेकडील वाऱ्यामुळे धुळीचे कण जमिनीवर तरंगत आहेत. हिवाळ्यात धुळीचे कण जमिनीवर स्थिर राहतात, कारण वारे पण स्थिर असतात.
हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (पीएम २.५)
१ जानेवारी
मुंबई ३०७
नवी मुंबई ३४९
अंधेरी ३०५
बीकेसी ३६३
मालाड ३२१
चेंबूर ३१२
माझगाव ३४२
३ जानेवारी
मुंबई २६९
नवी मुंबई ३२७
अंधेरी ३१२
बीकेसी ३०४
मालाड ३१३
चेंबूर ३०७
माझगाव ३१८
८ जानेवारी
मुंबई ३१९
नवी मुंबई ३३०
अंधेरी ३३१
बीकेसी ३४२
चेंबूर ३१२
माझगाव ३१३
बोरीवली ३२१
मालाड ३१२
कुलाबा ३४९
वरळी २१८