मुंबई: देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोरोना लस सुरक्षित असल्याचा संदेश देशवासीयांना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वयाची साठी ओलांडलेल्या नेत्यांनी कोरोनावरील लस टोचून घेतली. मात्र लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयात असाच एक प्रकार घडला आहे. अरे व्वा! कोरोना लसीचा चमत्कार; कोरोनापासून बचावासह इतरही आजार झाले दूर, महिलेनं सांगितला अनुभव...एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना लसीचा दुसरा डोज घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याला कोरोनाची बाधा झाली. दोन्ही डोज घेतल्यानंतरही विद्यार्थ्याच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार न झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. २१ वर्षांच्या विद्यार्थ्यांला गेल्या आठवड्यात कोविशील्ड लसीचा दुसरा डोज देण्यात आला होता. कोरोना व्हायरसचा डोळ्यांवर होतोय गंभीर परिणाम; सुरूवातीला 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हाकोरोनाचा दुसरा डोज घेतल्यानंतर काही दिवसांत कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आल्यानं विद्यार्थ्यानं चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला शनिवारी रात्री सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याच्यासोबत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं. या विद्यार्थ्यांनीदेखील थोड्याच दिवसांपूर्वी कोरोना लसीचा डोज घेतला आहे.कोरोना लस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ठराविक वेळेत रोगप्रतिकार शक्ती तयार होईलच असं नाही, असं सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितलं. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे. कोरोनावरील लस दिल्यानंतर शरीरात रोगप्रतिकार शक्ती तयार होण्यास ४५ दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो. लसीचा डोज घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती अडसूळ यांनी दिली.
कोरोना लसीचा दुसरा डोज घेतल्यानंतर MBBSचा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 3:59 PM