एमडी प्रकरणातील फार्मासिस्टच्या मित्राला कोठडी
By admin | Published: January 15, 2017 02:08 AM2017-01-15T02:08:53+5:302017-01-15T02:08:53+5:30
घाटकोपरच्या दोन कोटींच्या एमडीप्रकरणी अटकेत असलेल्या फार्मासिस्ट प्रवीण वाघेलाच्या सहकारी मित्राला शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
मुंबई : घाटकोपरच्या दोन कोटींच्या एमडीप्रकरणी अटकेत असलेल्या फार्मासिस्ट प्रवीण वाघेलाच्या सहकारी मित्राला शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रामदास पांडुरंग नायक (४०) असे त्यांचे नाव असून तोही फार्मासिस्ट असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
नोकरी सुटली म्हणून खेरवाडी येथील रहिवासी असलेला वाघेला ड्रग्जच्या धंद्यात उतरला होता. त्याच वेळी एका शास्त्रज्ञाच्या मदतीने त्याने फार्मासिस्ट मित्र नायकला मदतीला घेतले. रामदास नायक मूळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. जास्तीचे पैसे मिळत असल्याने तो या जाळ्यात अडकत गेला. यातूनच त्यांनी एमडी बनविण्यास सुरुवात केली आणि एमडीचा राज्यभरात पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले. कर्नाटकात अटक करण्यात आलेल्या नायकला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)