धारावीतून २१ लाखांचे एमडी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलिसांची अंमलीपदार्थविरोधी कारवाई सुरू असून, शनिवारी रात्री एकाकडून तब्बल २१० ग्रॅम एमडी पदार्थ जप्त केले. ड्रग्जच्या बाजारपेठेत त्यांची किंमत २१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. धारावीतील ९० फुटी रोडच्या परिसरात छापा टाकून समद शेख (वय ३२) याला अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या वरळी पथकाला धारावीच्या ९० फुटी रस्त्यावर एकजण अंमलीपदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार प्रभारी निरीक्षक दीपक चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाळत ठेवून शेखला पकडले. त्याची झडती घेतली असता, २१० ग्रॅम मेफोडीन (एमडी) मिळाले. शेख याच्यावर पोस्को, विनयभंग, मारामारी असे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.
------------