गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तडीपार केलेल्या गुन्हेगाराकडून ३० लाख किमतीचा एमडी जप्त करण्यात आला. जॉन डेविड जोसेप (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली
मालाड परिसरात एकजण ड्रग्जच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून जोसेपला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ३०० ग्रॅम एमडी जप्त केला. याची किंमत ३० लाख रुपये आहे.
जोसेपविरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताे सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरीप्रकरणी गुन्हा नोंद असून त्याला हद्दपारही करण्यात आले आहे. त्याने हा माल कुठून आणला? याबाबत अधिक तपास सुरू आहे.
* वाडीबंदरमध्ये सापडला ४० लाखांचा चरस
मुंबईत चरसची विक्री करणाऱ्या दुकलीला अमली पदार्थविरोधी विभागाच्या आझाद मैदान पथकाने मंगळवाऱी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकड़ून एक किलो २०० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. धर्मेंद्र मिश्रा (वय ४२) आणि राहुल शर्मा (२४) अशी अटक दुकलीची नावे आहेत. यात धर्मेंद्र हा कुर्ला, तर राहुल हा धारावीतील रहिवासी आहे. आझाद मैदान पथक वाडीबंदर परिसरात गस्त घालत असताना, अटक केलेल्या दुकलीच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या नजरेत पडल्या. त्यानुसार, पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत १ किलो २०० ग्रॅम चरस सापडला.
....