केडीएमसीसाठी मनसेने गुंडाळला परीक्षाप्रपंच

By admin | Published: September 30, 2015 02:05 AM2015-09-30T02:05:46+5:302015-09-30T02:05:46+5:30

उमेदवार निश्चित करण्याकरिता आतापर्यंत इच्छुकांची लेखी परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारांची

MDS for KDMC rolled out | केडीएमसीसाठी मनसेने गुंडाळला परीक्षाप्रपंच

केडीएमसीसाठी मनसेने गुंडाळला परीक्षाप्रपंच

Next

मुंबई : उमेदवार निश्चित करण्याकरिता आतापर्यंत इच्छुकांची लेखी परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग रचना निश्चित करण्यास विलंब झाल्याने परीक्षेचे सिलॅबस आणि पेपर तयार करण्यास वेळ न मिळाल्याने तोंडी परीक्षेवर भागवण्याचे मनसेने ठरवले आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक महापालिका निवडणुकीच्यावेळी मनसेने इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती. विविध नागरी समस्या व सामान्य ज्ञान विषयक प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांचा मनसेने उमेदवारीकरिता विचार केला होता. त्यानंतर तोंडी मुलाखतीच्यावेळी व्हिडिओ शुटींग करून आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही कुणीही बंडखोरी करणार नाही, अशी हमी मनसेने घेतली होती. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसे अन्य कुठल्याही पक्षासोबत युती करणार नसून सर्वच्या सर्व १२२ जागा लढवणार आहे.
मनसे कुठलीही परीक्षा घेणार नसल्याचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी दिली. मनसेला सध्या उतरती कळा लागली आहे. अशा परिस्थितीत सर्व जागांचे आव्हान पेलताना परीक्षा घेणे साहसवादी ठरेल यामुळे मनसेने त्याला सोडचिठ्ठी दिल्याचे समजते.

Web Title: MDS for KDMC rolled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.