Join us

आदिमाया आदिशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भोजन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:10 AM

मुंबई : आदिमाया आदिशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुण्याच्या देहू रोड येथील माई बाल भवनमधील दिव्यांग मुलांना भोजन वाटप करण्यात ...

मुंबई : आदिमाया आदिशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुण्याच्या देहू रोड येथील माई बाल भवनमधील दिव्यांग मुलांना भोजन वाटप करण्यात आले. आदिमाया आदिशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच सामाजिक कार्यात पुढे राहून आपल्या संस्कृतीचे जतन करत आली आहे. ट्रस्टच्या वतीने समाजातील गरीब व गरजूंना कायम मदतीचा हात पुढे करण्यात येतो. यंदा पुण्याच्या देहू रोड येथील शीतला नगर येथे माई बाल भवनमधील ५० ते ६० दिव्यांग मुलांना भोजन वाटप करण्यात आले. माई बाल भवनच्या देशपांडे मॅडम, आदिमाया आदिशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका जयश्री आकाश कांबळे, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आकाश उत्तम कांबळे, खजिनदार विठ्ठल सोपान सोनवणे आणि सदस्य अशोक वनवे यांच्या हस्ते हे भोजन वाटप करण्यात आले. याप्रसंगी माई बाल भवनचे कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.