राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी-अंमलदारांना पदक प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:12 AM2020-02-19T02:12:05+5:302020-02-19T02:12:10+5:30
गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत ९५ पदकांचे वितरण
मुंबई : पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या पोलीस शौर्यपदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी वितरण झाले. पोलीस मुख्यालयात झालेल्या या सोहळ्यात एकूण ९५ अधिकारी-अंमलदारांना शिस्तबद्ध पद्धतीने वितरण करण्यात आले. या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिन २०१८ आणि प्रजासत्ताक दिन २०१९ ला घोषित केलेली आठ शौर्यपदके, उल्लेखनीय सेवेबद्दल ७ राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ८० पोलीस पदके प्रदान करण्यात आली. गौरवमूर्तींमध्ये अप्पर महासंचालक (एसीबी) बिपीन सिंह, उपमहानिरीक्षक नवीनचंद्र दत्ता रेड्डी, जळगावचे अधीक्षक डॉ. पंजाबराव वसंतराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव, सोलापूर ग्रामीणचे
मनोज पाटील, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, समादेशक श्रीकांत व्यंकटेश पाठक, उपायुक्त सारंग दादाराम आवाड आदींचा समावेश होता. गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक प्रदान करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी. सोबत गृहमंत्री अनिल देशमुख.