कामगारांच्या मागण्यांसाठी मुंबईतील सेंच्युरी मिल येथे आंदोलन करणाऱ्या सामाजिका कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिल कामगारांशी चर्चा न करताच सेंच्युरी मिलनं स्वेच्छा निवृत्तीची नोटीस कामगारांच्या घरावर चिटकविल्याच्या विरोधात मेधा पाटकर यांनी उपोषण आंदोलन पुकारलं होतं. मेधा पाटकर यांच्यासह घर बचाओ अभियानचे कार्यकर्ते सेंच्युरी मिल बाहेर आंदोलन करत होते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन दादर येथील सैतान पोलीस ठाण्यात नेलं आहे.