नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी माध्यमांनी समांतर खटला चालवू नये, तसेच मृत व्यक्तीसह साक्षीदार व संशयितांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा सन्मान करावा, असे आवाहन प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाने जारी केलेल्या सल्लापत्रात (अॅडव्हायजरी) केले आहे.सल्लापत्रात म्हटले आहे की, तपास आणि खटला यावर दबाव येईल अशा पद्धतीने माध्यमांनी स्वत:च समांतर खटला चालवून निर्णयाचे सूचन करू नये.आरोपींचा प्रकरणाशी संबंध असल्याबाबत सामान्य लोकांत विश्वास निर्माण होईल, अशा पद्धतीच्या कहाण्या माध्यमांनी सांगू नये. तपास करणाऱ्या संस्थेच्या तपासाच्या दिशेबाबत सांगीवांगीच्या आधारावर माहिती प्रसिद्ध करणे अपेक्षित नाही.प्रेस कौन्सिलने म्हटले की, गुन्ह्याशी संबंधित मुद्यांचे रोजच्या रोज जोरदारपणे वार्तांकन करणे अपेक्षित नाही, तसेच तथ्याच्या आधाराशिवाय पुराव्याबाबत कोणत्याही प्रकारे टिपणी करणे अपेक्षित नाही. अशा वार्तांकनामुळे पारदर्शक तपास आणि खटल्यावर अकारण दबाव येतो.सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रेस कौन्सिलने म्हटले की, याप्रकरणी माध्यमांना सल्ला देण्यात येतो की, मृत, साक्षीदार, संशियत आणि आरोपी यांना अवास्तव प्रसिद्धी देऊ नये. हा त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग आहे.साक्षीदारांची ओळख जाहीर करणे टाळावे. कारण त्यामुळे त्यांच्यावर आरोपी अथवा तपास संस्थांकडून दबाव येण्याचा धोका संभवतो.सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत काही वृत्तपत्रांनी केलेले वार्तांकन हे कौन्सिलने आत्महत्येच्या वार्तांकनाबाबत घालून दिलेल्या नियमांचा भंग करणारे आहे, असेही सल्लापत्रात म्हटले आहे.
सुशांतसिंहप्रकरणी प्रसारमाध्यमांनी समांतर खटला चालवू नये, ‘प्रेस कौन्सिल’ने जारी केले सल्लापत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 4:52 AM