प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन करावे : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:25 AM2020-09-04T01:25:09+5:302020-09-04T06:56:53+5:30

सुशांत आत्महत्येप्रकरणी मीडिया ट्रायल होत असल्याचा आरोप करणाऱ्या दोन याचिकांची सुनावणी न्या. ए.ए. सय्यद व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. एक याचिका आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी दाखल केली आहे.

Media should report responsibly: High Court | प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन करावे : उच्च न्यायालय

प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन करावे : उच्च न्यायालय

Next

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचे वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा. तसेच वार्तांकनाचा तपासावर काहीही परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केली.

सुशांत आत्महत्येप्रकरणी मीडिया ट्रायल होत असल्याचा  आरोप करणाऱ्या दोन याचिकांची सुनावणी न्या. ए.ए. सय्यद व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. एक याचिका आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी दाखल केली आहे. प्रसारमाध्यमांनी मुंबई पोलिसांविरुद्ध मोहीम हाती घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर दुसरी जनहित याचिका दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. प्रसारमाध्यमांनी खळबळजनक वार्तांकन करून नये असे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिककर्त्यांनी केली आहे.

‘तपासासंदर्भात वार्तांकन करताना किंवा वृत्त प्रसिद्ध करताना प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा किंवा तपासावर काहीही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने वार्तांकन करावे, अशी आम्ही विनंती आणि अपेक्षा करतो,’ असे न्यायालयाने म्हटले. पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

Web Title: Media should report responsibly: High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.