मध्यस्थी करणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:07 AM2021-06-16T04:07:40+5:302021-06-16T04:07:40+5:30

मुंबई : चेंबूर कॅम्प परिसरात रविवारी रात्री उशिराने दोन गटात सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागात समाधान खंदारे यांच्यावर ...

Mediation was expensive | मध्यस्थी करणे पडले महागात

मध्यस्थी करणे पडले महागात

Next

मुंबई : चेंबूर कॅम्प परिसरात रविवारी रात्री उशिराने दोन गटात सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागात समाधान खंदारे यांच्यावर चाक़ूने वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

.............................................................

सांताक्रूझमध्ये भेसळयुक्त दुधाची विक्री

मुंबई : सांताक्रूझ येथे आदर्श नगर परिसरातील दुर्गामाता चाळीत राहणारा आरोपी घरात नामांकित दूध पिशव्यांमध्ये दूषित पाणी टाकून भेसळयुक्त दुधाची विक्री करत असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आले. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने येथे मंगळवारी छापा टाकला. त्याच्या घरातून १७६ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले असून वाकोला पोलिसांनी आरोपीला अटक केली.

.........................................................

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला बेड्या

मुंबई : महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या तरुणाला कल्याणमधून अटक करण्यात आली. विनोबा भावे नगर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने ३९ वर्षीय महिलेचे फेसबुक अकाउंटवर वेगवगेळ्या नावांनी अश्लील फोटो व्हायरल केले होते. फेसबुक अकाउंट बंद करताच आरोपीने संबंधित महिलेच्या मित्रमंडळीना ते फोटो टॅग करण्यास सुरुवात केली.

.......................................

Web Title: Mediation was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.