मेडिकल कौन्सिल केले बरखास्त! केंद्र सरकारची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:20 AM2018-09-29T07:20:06+5:302018-09-29T07:20:19+5:30
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेत अखेर केंद्र सरकारने हे बोर्ड बरखास्त केले आहे. देशभरातील एमसीआयच्या सदस्यांना तातडीने त्यांची कार्यालये रिकामी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.
मुंबई : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेत अखेर केंद्र सरकारने हे बोर्ड बरखास्त केले आहे. देशभरातील एमसीआयच्या सदस्यांना तातडीने त्यांची कार्यालये रिकामी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने एक ओव्हरसाईट कमिटी नेमली होती. त्यांनी दिलेले अनेक निर्देशही एमसीआयने पाळले नव्हते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमसीआयच्या सदस्यांना वारंवार केंद्राने सूचना देऊनही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नव्हता. २६ सप्टेंबरपासून हे बोर्ड बरखास्त करण्यात आले असून त्याजागी नवीन सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. व्ही. के. पॉल नवे चेअरमन
डॉ. व्ही. के. पॉल आता एमसीआयचे नवे चेअरमन असतील.
डॉ. रणदीप गुलेरिया (डायरेक्टर, एम्स दिल्ली), डॉ. जगत राम (डायरेक्टर, पीजीआयएमईआर, चंदीगड), डॉ. बी. एम. गंगाधर (डायरेक्टर, एमआयएमएचएनएस, बंगळुरू), डॉ. निखील टंडन (प्रोफेसर, डिपार्टमेंट आॅफ इंडोक्रोनॉलॉजी अॅण्ड मेटाबोलिझम, एम्स, दिल्ली), डॉ. एस. वेंकटेश (डायरेक्टर जनरल आॅफ हेल्थ सर्व्हिसेस आरोग्य विभाग, दिल्ली) व डॉ. बलराम भार्गव (सेक्रेटरी, हेल्थ डिर्पाटमेंट, डायरेक्टर जनरल इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च, दिल्ली) या सहा नव्या सदस्यांचा समावेश असेल.