आयआयटीमध्ये वैद्यकीय, फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:16 AM2018-01-03T05:16:02+5:302018-01-03T05:16:10+5:30
आयआयटी बॉम्बे ही शिक्षण संस्था अभियांत्रिकी आणि अन्य टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. पुढच्या ५ वर्षांच्या ‘स्ट्रॅटेजी प्लॅन’नुसार, आता आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय, फायन्सास, फिल्म मेकिंग, वाणिज्य आणि फाइन आर्ट्सचे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
मुंबई - आयआयटी बॉम्बे ही शिक्षण संस्था अभियांत्रिकी आणि अन्य टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. पुढच्या ५ वर्षांच्या ‘स्ट्रॅटेजी प्लॅन’नुसार, आता आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय, फायन्सास, फिल्म मेकिंग, वाणिज्य आणि फाइन आर्ट्सचे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. २०१७-२०२२ या वर्षासाठी हा आराखडा तयार केला आहे.
येत्या ५ वर्षांत आयआयटीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येतील. सामाजिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. आयआयटीत पदवी अभ्यासक्रमही सुरू करण्यात येतील. मुंबईमध्ये सिनेमा क्षेत्रातील अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे आता फिल्म मेकिंग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.