पालिका कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय विमा संरक्षण

By admin | Published: April 17, 2015 12:20 AM2015-04-17T00:20:46+5:302015-04-17T00:20:46+5:30

केंद्र शासनाच्या वैद्यकीय योजनेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय गट विमा योजनेचे संरक्षण देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला़

Medical insurance cover for municipal employees | पालिका कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय विमा संरक्षण

पालिका कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय विमा संरक्षण

Next

मुंबई : केंद्र शासनाच्या वैद्यकीय योजनेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय गट विमा योजनेचे संरक्षण देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला़ ५ लाखांपर्यंत मदत मिळण्याची हमी देणाऱ्या या विम्याचा लाभ पालिकेतील १ लाख ११ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे़
या योजनेचा लाभ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनाही मिळणार आहे़ २४ तासांहून अधिक काळ रुग्णालयात दाखल कर्मचाऱ्याच्या उपचाराचा खर्च या योजनेंतर्गत मिळू शकेल़ डायलिसीस, केमोथेरपी, टॉक्सीलेक्टोमी, डोळ्यांची शस्त्रक्रिया आणि अपघातामुळे होणाऱ्या दातांवरील शस्त्रक्रियेच्या बाबतीत २४ तासांची अट शिथिल करण्यात येणार आहे़ एका खासगी विमा कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे़
देशातील सुमारे ४ हजार रुग्णालये, मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पनवेल येथील ३२० रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधाही उपलब्ध होणार आहे़ विशेष म्हणजे या योजनेत प्रसूतीकाळातील वैद्यकीय खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे़ तसेच शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय सल्लागार व वैद्यकीय तज्ज्ञ यांच्या फीसाठी मर्यादा घालण्यात आलेली नाही़ (प्रतिनिधी)

च्कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे़
च्विमा योजना कार्यान्वित होण्यापूर्वी झालेल्या आजारांनाही विमा संरक्षण़
च्रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ३० दिवस आधीपर्यंत आजाराच्या तपासण्यांवर झालेला खर्चही देण्यात येणाऱ
च्रुग्णालयातून घरी पाठविल्यानंतरही पुढील ६० दिवसांपर्यंत औषधोपचारांचा खर्च मिळणार आहे़
च्नॉर्मल डिलिव्हरीसाठी ३५ हजार रुपये तर सिझेरियनसाठी ५० हजार रुपये विमा संरक्षण मिळेल़ तसेच अपघातामुळे गर्भपात झाल्यासही उपचाराचा खर्च मिळणार आहे़

Web Title: Medical insurance cover for municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.