Join us

वैद्यकीय महाविद्यालय आवारात औषधी झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:09 AM

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या आवारात आयुर्वेदिक औषधांसाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पतींच्या पाच हजार झाडांची लागवड करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी दिली.

मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या आवारात आयुर्वेदिक औषधांसाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पतींच्या पाच हजार झाडांची लागवड करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी दिली. वन विभागामार्फत राबविण्यात येणाºया १३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.देशमुख यांनी सांगितले, वन विभागामार्फत लावण्यात येणाºया वृक्ष लागवडीअंतर्गत चिंच, बेल, कवठ, कडूलिंब यांच्यासारखी मोठी वाढणारी झाडे लावण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या आवारात ही लागवड करण्यात येणार आहे. पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत देण्यात येणाºया रुग्णसेवेत गुणवत्तापूर्ण बदल करण्यात आले आहेत.प्राचीन काळापासून महत्त्व असलेल्या आयुर्वेदिक औषध प्रणालीमध्ये असलेल्या गुणांच्या आधारावर अनेक रोगांवर उपचार करता येऊ शकतात. काही आजारांमध्ये दीर्घकाळ उपचार करावे लागतात. अशा वेळी आयुर्वेदातील उपचार पद्धती गुणकारी ठरते. अनेक औषधी वनस्पती आता विस्मृतीत जाऊ लागल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांवर आयुर्वेदात उत्तम उपचार पद्धती सांगितली आहे. रोजच्या परिचयातील वनस्पतींमधील औषधी गुण ओळखता यायला पाहिजेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन आयुर्वेद उपचार पद्धतीबाबत सर्व स्तरांवर जनजागृतीसाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.>आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढलीदेशात आयुर्वेद उपचार पद्धतीत औषधी वनस्पतींना फार पूर्वीपासून वापरात आणण्यात येत आहे. जागतिकीकरणामुळे या औषधी वनस्पतीची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन राज्यातील औषधी वनस्पतींची भौगोलिक नकाशानुसार उपलब्धता व या वनस्पतीच्या संकलनाचे काम राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने केले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.