मुंबई : मुंबईसह राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी येत असतात. महापालिकेच्या रुग्णालयात येणाºया या रुग्णांमध्ये गरिबांची संख्या अधिक असते. त्यामुळे त्यांना जास्त किमतीची औषधे घेणे शक्य नसते. त्यामुळे अशा रुग्णांना दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाच्या धर्तीवर वाजवी दरात औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी ‘अमृत फार्मसी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या ‘अमृत औषध भांडार’मध्ये गरीब रुणांना केवळ ४० टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध होणार आहेत. हे औषधांचे दुकान रुग्णालय आवारातच उभारण्यात येणार आहे. बºयाचदा काही औषधे बाहेरील फार्मसीमधून घ्यावी लागतात, ही औषधे महागही असतात, अशा स्थितीत आता सर्व औषधे सवलतीच्या दरात रुग्णांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत.लवकरच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणारदेशातील अन्य काही राज्यांमध्ये अशा स्वरूपाची औषधांची योजना सुरू करण्यात आली आहे. त्या धर्तीवर पूर्णपणे जेनेरिक औषधे या औषध भांडारमध्ये उपलब्ध असतील. या माध्यमातून लोकांना ब्रँडेड औषधांना पर्याय उपलब्ध होईल. शिवाय, आरोग्यसेवेतील औषधांचा खर्च तुलनेत कमी होईल. महापालिका रुग्णालयांच्या आवारात हे भांडार सुरू होणार असून याचे प्राथमिक टप्प्यावरील काम सुरू झाले आहे. लवकरच काही रुग्णालयांच्या आवारात प्रायोगिक तत्त्वावर हे औषध भांडार सुरू होईल, असे महापालिका रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांंगितले.
आता औषधे मिळणार ४० टक्के सवलतीच्या दरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 7:15 AM