Join us

संसर्ग टाळण्यासाठी ध्यान, योग फायद्याचे ठरले - आचार्य लोकेशजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 2:40 AM

जैन धर्माच्या पर्युषण महापर्वामध्ये लोकेशजी यांचे आॅनलाइन व्याख्यान होत असून, याद्वारे भगवान महावीरांच्या संदेशाचा भाविकांना लाभ घेता येत आहे.

मुंबई : भगवान महावीरांनी आत्मशोध आणि आत्मप्राप्तीसाठी नियमित ध्यान आणि चिंतनावर जोर दिला होता. ध्यानधारणेमुळे आंतरिक शक्ती जागृत होतात. आत्मा भिन्न आणि शरीर भिन्न आहे आणि हा फरक विज्ञानाचा अनुभव आहे. येथूनच आध्यात्मिक प्रवास सुरू होतो, असे अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य लोकेशजी म्हणाले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीवाढीसाठी ध्यान, योग, प्राणायाम फायद्याचे ठरले आहेत, असेही ते म्हणाले. जैन धर्माच्या पर्युषण महापर्वामध्ये लोकेशजी यांचे आॅनलाइन व्याख्यान होत असून, याद्वारे भगवान महावीरांच्या संदेशाचा भाविकांना लाभ घेता येत आहे.पर्युषण पर्व व्याख्यानमालेत शांतीचा संदेश, ध्यान या विषयावर भाविकांना संबोधित करताना आचार्य लोकेशजी यांनी सैद्धांतिक ज्ञान आणि ध्यान व्यवहार याची माहिती दिली. ध्यानसाधना ही मानसिक शांती आणि तणावमुक्तीसाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे नकारात्मक भावना नष्ट होतात. सकारात्मक ऊर्जा संप्रेषण होते. अनेक प्रकारचे मनोविकार रोगही ध्यानातून सोडवले जातात. भगवान महावीरांच्या भाषणानुसार ध्यानअंतर्गत तपश्चर्या आहे. उपवास करण्यापेक्षा त्याचे महत्त्व अधिक आहे. भगवान महावीरांनी दीक्षा घेतल्यानंतर बारा वर्षे ध्यानधारणांचे विविध प्रयोग केले. त्यावरून त्यांना फक्त ज्ञान प्राप्त झाले.>अहिंसा विश्व भारती :२२ आॅगस्टपर्यंत कार्यक्रम सुरू राहतील.२१ आॅगस्ट - समता योग, अध्यात्माचे सार२२ आॅगस्ट - क्षमाशीलता हाच खरा दागिना