मीनाताई ठाकरे रक्तपेढीत आता स्वयंचलित यंत्रणेद्वारे रक्ताची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:05 AM2021-03-31T04:05:52+5:302021-03-31T04:05:52+5:30
मुंबई : मीनाताई ठाकरे रक्तपेढीने आधुनिकतेची कास धरत येथे रक्ताच्या चाचणीची स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मीनाताई ठाकरे ...
मुंबई : मीनाताई ठाकरे रक्तपेढीने आधुनिकतेची कास धरत येथे रक्ताच्या चाचणीची स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.
मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे संस्थापक व शिवसेेेना नेेेतेे व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या रक्तपेढीची मालाड व दक्षिण मुंबई येथे दोन स्टोरेज सेंटर आहेत. या रक्तपेढीने रक्तगट, क्रॉस मॅचिंग, अँटीबॉडी स्क्रीनिंग आणि टीटीआय रोगांचे परीक्षण करण्यासाठी स्वयंचलित नवीन उपकरणे उपयोगात आणून नवीन बदल केला आहे.
गोरेगाव पश्चिम ओझोन अॅक्टिव्हिटी सेंटर येथे रक्तपेढी व रक्त सुरक्षा विषयावर मीनाताई ठाकरे रक्तपेढी आयोजित वैज्ञानिक परिसंवादाचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी सुभाष देसाई म्हणाले, गरजू रुग्णांना सुरक्षित रक्त पुरविण्यासाठी बदलत्या काळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज यावर भर दिला. रक्तपेढीचे कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी त्यांनी सल्लागारांचे आभार मानले. रक्तदानाच्या उदात्त कारणावर जोर दिला. स्वेच्छेने रक्तदानाच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याची विनंती केली.
रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आदित्य तरे यांनी मीनाताई ठाकरे रक्तपेढीने आधुनिकतेची कास धरत नव्याने स्थापित स्वयंचलित यंत्रांची तांत्रिक वैशिष्ट्ये, रुग्णांना रक्त सुरक्षा वाढविण्याच्या फायद्यांविषयी
सविस्तर माहिती दिली. ग्रुपिंग, क्रॉस मॅचिंग, एचआयव्हीसारख्या टीटीआय आजारासाठी विंडो कालावधी कमी करणे आणि प्रक्रियेसाठी लागणार वेेेळ कमी करणे याविषयीची संवेदनशीलता आणि वैशिष्ट्ये या विषयी माहिती दिली. तसेच पुरेशा रक्त पिशव्या ठेवण्यासाठी हे स्टोरेज अद्ययावत रेफ्रिजरेटरने सुसज्ज आहे आणि डेटा लॉगद्वारे सतत तापमान देखरेख करत असल्याचे डॉ. तरे म्हणाले.
---------------------------------------