Join us

मुंबई व ठाण्याच्या गतीनेच मीरा भाईंदरचा विकास होणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By धीरज परब | Published: October 22, 2023 7:18 PM

सरकार मागे हटणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरारोड येथे नवरात्रौत्सव भेटी दरम्यान दिली. 

मुंबई -मुंबई व ठाण्याच्या जवळचे शहर असल्याने मीरा भाईंदरचा विकास सुद्धा तेवढ्याच वेगाने होईल . ज्या ज्या सुविधा हव्यात , जेवढा निधी हवा तेवढा देऊ . सरकार मागे हटणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरारोड येथे नवरात्रौत्सव भेटी दरम्यान दिली. 

मीरारोडच्या रामदेव पार्क जवळ बॅथल व साई चरण संकुल समोर असलेल्या महापालिका मैदानात आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे .  प्रीती - पिंकी यांच्या गाण्यांवर गरबाप्रेमी थिरकत आहेत. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी रात्री नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेत नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या . या वेळी आ . सरनाईक सह युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक , जिल्हाप्रमुख राजू भोईर , जिल्हासंघटक निशा नार्वेकर , सचिन मांजरेकर , विक्रमप्रताप सिंह आदींसह माजी नगरसेवक , पदाधिकारी उपस्थित होते. 

 

 सण - उत्सव हा आपला वारसा असून ते उत्साहाने साजरे करा . लोकांचा आवाज ऐकणारे हे आपले सरकार आहे . अनेक बंद पडलेले प्रकल्प आपल्या सरकाने सुरु केले असून विकासाचा अजेंडा घेऊन काम करतोय असे मुख्यमंत्री म्हणाले . मुख्यमंत्री शिंदे सरकारने मीरा भाईंदरच्या विकासासाठी विविध माध्यमातून सुमारे ३ हजार कोटींचा निधी मंजूर केल्याचे आ . सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईमीरा-भाईंदर