मुंबई: खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सॲपद्वारे मिळाली आहे."तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मूसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स," अशा आशयाची ही धमकी असून याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिल्याचेही समजते.
या व्हॉट्सॲप मेसेजची दखल घेत राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना कळवले असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. याआधी राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती.
बिश्नोई टोळीने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला संपवण्याची धमकीही दिली होती. मार्च २०२२ मध्ये, सलमान खानच्या कार्यालयाला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून वर्षापूर्वी एका काळवीटाची 'हत्या' करून बिश्नोई समुदायाला 'अपमानित' केल्या प्रकरणी धमकी मिळाली.