नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘लाइफलाइन’ची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:56 AM2019-12-31T03:56:48+5:302019-12-31T03:57:10+5:30

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष लोकल

Meet the 'Lifeline' to welcome the New Year | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘लाइफलाइन’ची साथ

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘लाइफलाइन’ची साथ

googlenewsNext

मुंबई : ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात. त्यांच्या या सेलिब्रेशनसाठी, तसेच परतीच्या प्रवासासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सीएसएमटी ते कल्याण आणि पनवेल दिशेकडे चार आणि चर्चगेट ते विरारदरम्यान चार विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येतील.

३१ डिसेंबर-१ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता कल्याणहून सीएसएमटीला जाण्यासाठी विशेष लोकल धावेल. ही लोकल सीएसएमटीला पहाटे ३ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, सीएसएमटीहून रात्री १.३० वाजता कल्याण दिशेकडे जाणारी लोकल सुटेल. ही लोकल कल्याण येथे पहाटे ३ वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून रात्री १.३० वाजता पनवेलला जाण्यासाठी विशेष लोकल धावेल. ती रात्री २.५० वाजता पनवेलला पोहोचेल, तर पनवेलहून रात्री १.३० वाजता सुटणारी विशेष लोकल सीएसएमटीला रात्री २.५० वाजता पोहोचेल.

चर्चगेट ते विरार शेवटची लोकल पहाटे ३.२५ वाजता
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना नववर्षाचे स्वागत करणे सोयीचे व्हावे, यासाठी चर्चगेट ते विरार चार लोकल फेºया आणि विरार ते चर्चगेट चार विशेष लोकल फेºया चालविण्यात येतील. मध्यरात्री १२.१५ची विरार-चर्चगेट ही पहिली धिमी विशेष लोकल असेल. ती मध्यरात्री १.५२ वाजता चर्चगेट येथे पोहोचेल. मध्यरात्री १२.४५ची विरार-चर्चगेट लोकल, मध्यरात्री १.४० वाजता विरार-चर्चगेट, पहाटे ३.०५ वाजता विरार-चर्चगेट लोकल चालविण्यात येणार आहे. चर्चगेट स्थानकातून पहिली धिमी विशेष लोकल मध्यरात्री १.१५ विरारसाठी सुटेल. ती मध्यरात्री २.५५ विरार येथे पोहोचेल. मध्यरात्री २ वाजता चर्चगेट-विरार, मध्यरात्री २.३० वाजता चर्चगेट-विरार, तर पहाटे ३.२५ वाजता चर्चगेट-विरार लोकल शेवटची लोकल म्हणून चालविण्यात येईल.

आज मध्यरात्री ‘बेस्ट’ सेवा
नववर्षाच्या स्वागतासाठी गेट वे आॅफ इंडिया, जुहू चौपाटी व मुंबईतील अन्य चौपाट्यांच्या ठिकाणी रात्री पर्यटक व मुंबईकरांची गर्दी होते. त्यांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे २० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांच्या सोयीसाठी बस क्रमांक ७ मर्यादित ही म्युझियम ते राणी लक्ष्मीबाई चौक (सायन), बस क्रमांक १११ म्युझियम ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, बस क्रमांक ११२ म्युझियम ते चर्चगेट स्थानक पूर्व, बस क्रमांक २०३ अंधेरी स्थानक (पश्चिम) ते जुहू चौपाटी, बस क्रमांक २३१ सांताक्रूझ स्थानक (पश्चिम) ते जुहू चौपाटी, बस क्रमांक २४७ व २९४ बोरिवली स्थानक (पश्चिम) मार्गे गोराई खाडी अशी धावणार आहे.

Web Title: Meet the 'Lifeline' to welcome the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.