मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठ संलग्नित अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये, मागासवर्गीय कोटा रद्द करण्याबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार दाद मागणार आहे. मात्र, त्यासाठी राज्य सरकार कधी पुढाकार घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, संघटनांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी थेट राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. मागासवर्गीय कोटा नाकारणाऱ्या घटनात्मक तरतुदीच्या विरोधात संसदेत आवाज उठविण्याचे आश्वासन, या वेळी शरद पवारांनी या विद्यार्थी संघटनांना दिले आहे.या बैठकीला प्रहार विद्यार्थी संघटना, मनसे, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, छात्रभारती या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. १७ जुलै रोजी मनुष्यबळ व मानव विकास संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत विद्यार्थी संघटनांची बैठक होणार आहे. यात योग्य निर्णय न झाल्यास जंतर मंतर येथे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे मनोज टेकाडे यांनी दिला.
मागासवर्गीय कोट्यासाठी संघटना शरद पवारांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 2:32 AM