मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वारंवार मतभेद निर्माण होत असल्याने या सरकारच्या भवितव्याबाबत दररोज शंका उपस्थित केली जात आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले काही आमदार घरवापसीसाठी इच्छुक असून, त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान, मलिक यांच्या दाव्याला भाजपाचे प्रवक्ते चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. मतदारसंघातील कामांसाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची भेट घेणे म्हणजे पक्षात प्रवेश करणे नव्हे, असे पाटील यांनी म्हटले आहे.भाजपा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, भाजपाचे काही आमदार आपापल्या मतदारसंघातील कामांच्या निमित्ताने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले होते. मात्र त्याचा अर्थ ते भाजपामध्ये प्रवेश करणार असा होता. नाही. अनेकांचे जुने संबंध कायम आहेत. त्यातून अशा भेटीगाठी होत असतात.दरम्यान, भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. यावर लवकरच निर्णय घेऊन सार्वजनिक जाहीर केले जाईल, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. तसेच काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी