एकनाथ शिंदे अन् नारायण राणेंच्या उपस्थितीत बैठक; सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या विविध विषयांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 09:05 PM2023-06-05T21:05:57+5:302023-06-05T21:19:33+5:30

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला १८ नोड उभारण्यात येत आहेत.

Meeting in the presence of CM Eknath Shinde and Central Minister Narayan Rane; Discussion on various topics of micro, small and medium enterprises | एकनाथ शिंदे अन् नारायण राणेंच्या उपस्थितीत बैठक; सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या विविध विषयांवर चर्चा

एकनाथ शिंदे अन् नारायण राणेंच्या उपस्थितीत बैठक; सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या विविध विषयांवर चर्चा

googlenewsNext

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयोजित बैठकीत महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  सूक्ष्म, लघु  आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विस्तारित केंद्रांसाठी १५ विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून काथ्या (कॉयर) उद्योग केंद्रासाठी कुडाळ येथे इमारत आणि खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पालिकेच्या जागा देण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला १८ नोड उभारण्यात येत आहेत, त्यात एमएसएमई उद्योग सुरू करुन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगून एमटीएचएल, मुंबई-पुणे महामार्ग विकासाचे राजमार्ग ठरणार आहेत. यामुळे उद्योग त्यातून उत्पादने आणि त्यांची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने १ ट्रिलियनचा सहभाग देण्याचा निश्चय केला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या मार्केटिंगसह या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विभागाचे मोठे सहकार्य लाभणार असून त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी दिली. खादी ग्रामोद्योग आणि काथ्या (कॉयर) उत्पादनांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई, ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देतानाच मरोळ येथे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाच्या प्रदर्शन केंद्राला मान्यता देण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

टेक्नॉलॉजी सेंटर्स उभारण्यात येणार-

राज्यात जास्तीत-जास्त तरुणांना प्रशिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून तंत्रज्ञान केंद्र (टेक्नॉलॉजी सेंटर्स) उभारण्यात येणार आहेत. मुंबई आणि औरंगाबादमध्ये तंत्रज्ञान केंद्रे यापूर्वीच कार्यरत झाली असून नागपूर, पुणे येथे या केंद्रांसाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध होणार आहे.  सिंधुदुर्ग येथील केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. त्याशिवाय अमरावती आणि नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे अतिरिक्त तंत्रज्ञान केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दाखवली. 

Web Title: Meeting in the presence of CM Eknath Shinde and Central Minister Narayan Rane; Discussion on various topics of micro, small and medium enterprises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.