पालिका कर्मचा-यांच्या बोनसची बैठक फिस्कटली, महापौरांना मध्यस्थीची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 04:06 AM2017-10-08T04:06:33+5:302017-10-08T04:06:55+5:30
चर्चा व कोणत्याही वाटाघाटीविना बोनस स्वीकारण्यास कामगार संघटनांनी नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच महापौरांना मध्यस्थीची संधी मिळाली आहे.
मुंबई : चर्चा व कोणत्याही वाटाघाटीविना बोनस स्वीकारण्यास कामगार संघटनांनी नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच महापौरांना मध्यस्थीची संधी मिळाली आहे. मात्र कामगार संघटनांची ४० हजार रुपये बोनसची मागणी आयुक्तांना मान्य नसल्याने बोलणी फिस्कटली. त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी येत्या सोमवारी महापौर दालनात पुन्हा बैठक बोलाविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी पालिका कर्मचाºयांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा २० टक्के अधिक म्हणजेच ४० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात गटनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपाचे गटनेते मनोज कोटकवगळता अन्य पक्षांचे गटनेते, पालिका आयुक्त अजय मेहता, संबंधित अतिरिक्त आयुक्त आणि पालिकेच्या कर्मचाºयांचे प्रतिनिधित्व करणाºया विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बेस्टचा बोनस पालिका देणार
बेस्टच्या कर्मचाºयांनाही पालिकेने बोनस द्यावा, अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांंनी केली आहे. याबाबतही सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.