Join us

नाट्य परिषदेचे पदाधिकारी उद्धव यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 4:12 AM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९८वे नाट्यसंमेलन येत्या १३ जूनला मुलुंडमध्ये होणार आहे.

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९८वे नाट्यसंमेलन येत्या १३ जूनला मुलुंडमध्ये होणार आहे. अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या नाट्यसंमेलनाची तयारीही आता जोरात सुरू झाली आहे. यासाठी मंगळवारी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत प्रसाद कांबळी आणि नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना आगामी नाट्यसंमेलनाच्या तयारीविषयी माहिती दिली.१३ जूनला ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली ९८वे नाट्यसंमेलन मुलुंडमध्ये रंगणार आहे. तब्बल २५ वर्षांनंतर नाट्यसंमेलन मुंबईत रंगणार आहे. या भेटीमध्ये नाट्यपरिषदेचे पुढील संकल्प आणि मुलुंडमधील आगामी नाट्यसंमेलनाच्या तयारीविषयी उद्धव ठाकरेंबरोबर नाट्यपरिषदेच्या पदाधिकाºयांची प्रदीर्घ चर्चा झाली. मुंबई महापालिकेकडून योग्य ती संपूर्ण मदत नाट्यपरिषदेला करण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाट्यपरिषदेच्या पदाधिकाºयांना दिली. सोमवारी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ९८व्या नाट्यसंमेलनाच्या डिजिटल लोगोचे अनावरण करण्यात आले. हा डिजिटल लोगोही या वेळी उद्धव ठाकरेंना दाखविण्यात आला.या वेळी नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाह आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे आणि ९८व्या मुलुंड नाट्यसंमेलनाचे निमंत्रक दिगंबर प्रभूही उपस्थित होते.