Join us  

राजकीय घडामोडींना वेग, अजित पवारांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 5:48 PM

महाविकास आघाडीतील नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे.

मुंबई- महाविकास आघाडीतील नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित आहेत.

या बैठकीत राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक अजित पवार यांचे निवासस्थान देवगिरी बंगल्यावर सुरु आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर ही बैठक सुरू आहे. 

काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह यांनी वादग्रस्त विधान केले होते. राज्यभरात मोर्चा तसेच आंदोलन करण्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच काही दिवसात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यावरही चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे कर्नाटक सीमावादावरुन पुन्हा कर्नाटक सरकारने विधान केली आहेत, यावरही चर्चा होणार आहे. 

मशीनमध्ये गडबड करुन करुन किती गडबड करणार; गुजरात निवडणुकीवर संजय राऊतांचा गंभीर आरोप!

आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाली, या दोन नेत्यांमध्ये दोन तास बैठक झाली. वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेता येत काय यावर ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीवरही आता महाविकास आघाडीमध्ये चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :महाविकास आघाडीअजित पवारउद्धव ठाकरेआदित्य ठाकरे