घाटकोपर राजावाडी येथील इमारत दुर्घटनास्थळी पालकमंत्री मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 12:59 PM2023-06-26T12:59:41+5:302023-06-26T13:00:41+5:30

शासनातर्फे  बचाव कार्यासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत पुरवली जात असल्याची त्यांनी काळजी घेतली आणि यंत्रणांना आघाताबाबतची सर्व तपासणी करण्याचे आदेश दिले.

Meeting of Mangal Prabhat Lodha at the building accident site in Ghatkopar Rajawadi | घाटकोपर राजावाडी येथील इमारत दुर्घटनास्थळी पालकमंत्री मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

घाटकोपर राजावाडी येथील इमारत दुर्घटनास्थळी पालकमंत्री मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

googlenewsNext

पहिल्या पावसामुळे २५ जून रोजी सकाळी ९;३० वाजता घाटकोपर पूर्व येथील राजावाडी कॉलन मध्ये एक जुनी तीन मजली इमारत जमिनीत कोसळली. अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरु झाले. या वेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा घटनास्थळी उपस्थित होते. 

शासनातर्फे  बचाव कार्यासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत पुरवली जात असल्याची त्यांनी काळजी घेतली आणि यंत्रणांना आघाताबाबतची सर्व तपासणी करण्याचे आदेश दिले. अपघातानंतर सुमारे १२ तासापेक्षा जास्त काळ बचाव कार्य सुरु होते. दुर्दैवाने या अपघातात इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन जणांचा मृत्यू झाला तर तर चार जणांना गंभीर दुखापत झाली. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

"झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून पीडित कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे.  या बाबतची सर्व तपासणी सुरु असून देण्यात पुढे अश्या घटना होऊ नये यासाठी शासन यंत्रणा तत्परतेने कार्यरत आहेत. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी आणि सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे" असं आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केलं. 
 

Web Title: Meeting of Mangal Prabhat Lodha at the building accident site in Ghatkopar Rajawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.