Join us

मराठी माध्यमात शिकणा-या मुलांच्या पालकांचे संमेलन, मराठी अभ्यास केंद्राचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 9:38 PM

मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या ‘मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुली – मुलांच्या पालकांचे संमेलन’ याबाबतची आयोजनपूर्व पुढील बैठक रविवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. उत्कर्ष मंदिर हायस्कूल, मामलेदारवाडी, मालाड (प) येथे घेण्यात येत आहे.

मुंबई, दि.14- मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या ‘मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुली – मुलांच्या पालकांचे संमेलन’ याबाबतची आयोजनपूर्व पुढील बैठक रविवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. उत्कर्ष मंदिर हायस्कूल, मामलेदारवाडी, मालाड (प) येथे घेण्यात येत आहे.

आपल्या पाल्याच्या गुणवत्ता वाढीत पालकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. तो सहभाग आणखी कसा वाढवता येईल, या भूमिकेतूनच मराठी अभ्यास केंद्र या मराठी शाळांसाठी काम करणाऱ्या संस्थेने 'मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुली-मुलांच्या पालकांचे संमेलन' नोव्हेंबर महिन्यात मुंबईत घेण्यात पुढाकार घेतला आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मुंबईतील वेगवेगळ्या शाळांमध्ये पालकांच्या बैठका घेण्यात येत आहे.  त्या बैठकांमधून पुढील मुद्यांवर भर देण्यात येत आहे.

१) मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व. 

२) इंग्रजी भाषा आणि इंग्रजी माध्यम यातला फरक.

३) इतरांचेही पाल्य मराठी माध्यमात शिकताहेत याचा विश्वास.

४) प्रयोगशील शाळांच्या उपक्रमांचे सार्वत्रिकीकरण. 

५) शाळांच्या सोयीसुविधांमधे पालकांचा सक्रीय सहभाग.

या बैठकीला सर्व पालकांनी जरूर उपस्थित रहावे. तसेच आपल्या परिसरातील आणि कुटुंबातील ज्या कुणाचे मूल आगामी काळात शाळेत प्रवेश घेण्याच्या तयारीचे होणार असेल अशाही पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक उत्कर्ष मंदिर हायस्कूल आणि मराठी अभ्यास केंद्र यांनी केले आहे.

टॅग्स :विद्यार्थी