लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गांवर, तसेच हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याचे संकेत आहेत.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५, असे ४ तास आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी १०:३५ ते दुपारी २:३५, असे चार तास मेगाब्लॉक असेल. त्यामुळे यादरम्यान लोकल सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असून, या कालावधीत सर्व लोकल १५ ते २० मिनिटांच्या उशिराने धावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हार्बर मार्गावर सकाळी ११:०५ ते संध्याकाळी ४:०५ असे ५ तास पनवेल-वाशीदरम्यान ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असतील, तसेच बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवाही सुरू राहतील.
- मध्य रेल्वे - माटुंगा ते मुलुंड जलद मार्ग - स. ११:०५ ते ३:०५
- पश्चिम रेल्वे - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल जलद - स. १०:३५ ते २:३५
- हार्बर - वाशी ते पनवेल - स. ११:०५ ते ४:०५