Join us

मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक; नियोजन करूनच घराबाहेर पडा  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 12:40 PM

रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (दि.५) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

पश्चिम रेल्वे-

पश्चिम रेल्वेवरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ४ आणि ५ मे रोजी मध्यरात्री १२:१५ ते पहाटे ४:१५ वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान अप, डाउन जलद मार्गावर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

या कालावधीत जलद मार्गावरील लोकल सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धिम्या मार्गावर चालविल्या जातील. रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नाही, असे प्रशासनकडून सांगण्यात आले.

रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी- सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम- या ब्लॉकदरम्यान सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत  सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल, या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांवर थांबतील.  पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

हार्बर रेल्वे :

कुठे - सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन मार्गावर

कधी -  सकाळी ११ ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम - ब्लॉक कालावधीत सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलहून सीएसएमटी/वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी सीएसएमटीसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीसाठी गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०.४५ ते ५.१३ पर्यंत बंद राहतील.

डाऊन हार्बर :

१) ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटीहून सकाळी ११.०४ वाजता सुटेल.

२) गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून सकाळी १०.२२ पर्यंत सुटेल.

३) ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटीहून दुपारी ४.५१ पर्यंत सुटेल.

४) ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटीहून ०४.५६ वाजता वांद्रेसाठी सुटेल.

अप हार्बर :

१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेलहून सकाळी ९.४० वाजता सुटेल.

२) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.

३) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेलहून दुपारी ३.२८ पर्यंत सुटेल.

४) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगावहून दुपारी ४.५८ ला सुटेल.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे