मुंबई : पादचारी पुलाचा गर्डर बदलण्यास आणि पुलाच्या दुरुस्तीस, ८ एप्रिल रोजी मध्य रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-कर्जत दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घोषत केला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर या काळात सांताक्रुझ ते माहिम दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशी मार्गावर कोणत्याही लोकल धावणार नाही.मध्य रेल्वेवर सकाळी ९.१५ ते दुपारी १.५३ दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून, कर्जत/ खोपोली/ बदलापूर/अंबरनाथला जाणाऱ्या सर्व गाड्या बंद राहतील. सकाळी १०.४८ ते दुपारी १.०६ वाजेपर्यंत ठाणे ते कर्जत/ बदलापूरला जाणाºया डाउन लोकल सेवा बंद राहतील. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.२३ वाजेपर्यंत अंबरनाथ/ बदलापूर/ कर्जत/ खोपोलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाºया सर्व लोकल सेवा बंद राहतील.पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान सांताक्रुझ व माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सांताक्रुझ आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालवल्या जातील.हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला-वाशी दरम्यानची अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक बंद राहील. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी कोणतीही लोकल सुटणार नाही, तसेच सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत पनवेल/ बेलापूर/ वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कोणत्याही लोकल सुटणार नाहीत. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल.मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदलडाउन एक्स्प्रेस - १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्स्प्रेस, १६३३९ मुंबई-तिरूनेलवेली नागरकोईल एक्स्प्रेस आणि १७०३१ मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस कर्जत पनवेल मार्गावरून धावतील. या गाड्या लोणावळा स्थानकावर २५ ते ३० मिनिटे उशिराने पोहोचतील. अप एक्स्प्रेस - १७०३२ हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, ११०४२ चेन्नई एक्स्पे्रस आणि ११०१४ कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस गाड्या कर्जत-पनवेल मार्गाने प्रवास करतील. कल्याण स्टेशनवरील प्रवाशांना दिवा स्टेशनवर थांबता येईल. या गाड्या अंतिम स्थानकांवर निर्धारित वेळेपेक्षा ३० मिनिटे उशिराने पोहोचतील.
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:53 AM