मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम, हार्बरच्या प्रवाशांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:53 AM2019-01-26T04:53:27+5:302019-01-26T04:53:49+5:30
रविवारी फक्त मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने पश्चिम, तसेच हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : रविवारी फक्त मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने पश्चिम, तसेच हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ब्लॉक काळात मध्य रेल्वे मार्गावर सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर येणाऱ्या आणि जाणा-या लोकल सेवा १० मिनिटे उशिराने धावतील.
मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉकदरम्यान मुलुंड ते माटुंगा कल्याण दिशेकडे जाणा-या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. सकाळी १०.५७ ते दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कल्याण दिशेकडे जाणा-या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर धावतील. त्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबणार नाहीत. त्यानंतर, मुलुंड येथून धिम्या मार्गावर धावतील. धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार, कांजूर, नाहूर येथेही थांबणार नाहीत.
सकाळी १० वाजून ५४ मिनिटांपासून ते सायंकाळी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याणवरून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील सर्व लोकल नियोजित थांब्यांसह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. याचप्रमाणे, सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत सीएसएमटीवरून कल्याण, कर्जत, कसारा दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील सर्व लोकल नियोजित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबविण्यात येतील.