मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:56 AM2018-02-18T00:56:43+5:302018-02-18T00:56:53+5:30

अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रविवार, १८ फेब्रुवारी रोजी मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घोषित केला आहे.

Mega block on the Central, Western Railway route today; Relief for passengers on the harbor route | मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

Next

मुंबई : अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रविवार, १८ फेब्रुवारी रोजी मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० दरम्यान कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नल प्रणालीच्या दुरुस्तीसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर रेल्वेसेवा बंद राहील.
रविवारी सकाळी १०.४८ ते दुपारी ४.१४ पर्यंत कल्याणहून सुटणाºया धिम्या आणि अर्ध जलद लोकल कल्याण ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. मुलुंडनंतर सर्व लोकल पुन्हा धिम्या मार्गावरून धावतील. ब्लॉक काळात लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा येथे थंबणार नाहीत. येथील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण येथून प्रवास करण्याची मुभा आहे, तर सकाळी १०.४५ ते दुपारी २.५४ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाºया सर्व डाउन जलद मार्गावरील लोकल निर्धारित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील. सकाळी ११.२३ ते सायंकाळी ४.०२ पर्यंत कल्याणहून सुटणाºया अप जलद लोकल निर्धारित थांब्याशिवाय दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर येथे थांबतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक आहे. ब्लॉक काळात अप दिशेला जाणाºया सर्व लोकल बोरीवली ते नायगाव दरम्यान धिम्या मार्गावर धावतील व सर्व स्थानकांवर थांबतील.

ट्रान्स हार्बर ठप्प
ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही, तसेच सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/नेरूळला जाणाºया, तसेच सकाळी १०.४५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ ते ठाणे दरम्यान लोकलसेवा बंद राहील. दरम्यान, हार्बर रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक नसेल. त्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Mega block on the Central, Western Railway route today; Relief for passengers on the harbor route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.