मुंबई : मध्य रेल्वेच्या मुलंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते माहिम या स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत जम्बो ब्लॉक आहे.
मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ठाणे स्थानकातूून, सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजून ४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबेल.
सकाळी १० वाजून १६ मिनिटे ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सीएसएमटी पासून कल्याणच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यामुळे लोकल स्थानकावर पोहोचण्यास २० मिनिटांचा विलंब लागेल. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व लोकल पोहोचण्यास १० मिनिटांचा विलंब लागणार आहे.हार्बर लोकल सकाळी ११ ते ५ राहणार बंद
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांच्या दिशेने जाणाºया लोकल रविवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत बंद असतील. चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटीपर्यंत सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत लोकल बंद असतील. तर, सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत सीएसएमटी आणि वडाळा रोडवरून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणारी लोकल बंद असतील.सकाळी ९ वा. ५६ मि. ते सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाववरून सीएसएमटीकडे जाणाºया लोकल बंद असतील. सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाववरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा बंद असतील.सांताक्रुझ ते माहिम दरम्यान जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते माहिम या स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० वा.३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत जम्बो ब्लॉक आहे.
जलद मार्गावरील दोन्ही मार्गांवर जम्बो ब्लॉक आहे. या दरम्यान जलदमार्गावरील लोकल सांताक्रुझ ते माहिम दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत, तर काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.