लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, १८ जून रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
कुठे : ठाणे - कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरकधी : सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० पर्यंतपरिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत अप-डाऊन मार्गावर जलद लोकल सेवा गंतव्यस्थानावर १० मिनिटे उशिरा पोहोचेल
कुठे : अंधेरी - गोरेगाव अप - डाऊन धिम्या मार्गावर कधी : सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालविल्या जातील. त्यामुळे प्लॅटफॉर्म न मिळाल्याने या गाड्या राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील तर काही बोरिवली लोकल गाड्या गोरेगावपर्यंत चालविल्या जाणार आहेत.
कुठे : पनवेल - वाशी अप आणि डाऊन मार्गावरकधी : सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यंतपरिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरिता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.