Join us

मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या ब्लॉक, लोकल १५ मिनिटे लेट; जाणून घ्या वेळापत्रक...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 10:27 AM

Mumbai Mega Block Update : मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

मुंबई : मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. या गाड्या नियोजित थांब्यावर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या पुन्हा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ या वेळेत  सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या लाइनवर वळविण्यात येतील. पुन्हा माटुंगा येथील अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या नियोजित थांब्यावर थांबतील. नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

डाऊन जलद मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल असेल. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.३९ वाजता सुटेल. अप जलद मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ असेल. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी ४.४४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

पश्चिम रेल्वे :

पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

हार्बर मार्ग :

कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत  वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल लोकल सकाळी १०.१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल. अप हार्बर मार्गावर पनवेल येथून शेवटची लोकल सकाळी १०.०५ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल / वाशी दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत ठाणे - वाशी / नेरुळ स्थानका मार्गे प्रवास करता येईल.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेपश्चिम रेल्वेहार्बर रेल्वे