Join us

नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरीच थांबा; रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 5:37 AM

रविवारी, १ जानेवारी, २०२३ रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, १ जानेवारी, २०२३ रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल होणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

मध्य रेल्वे

कुठे- माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत 

परिणाम- या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील, तसेच ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगाच्या दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील, तसेच १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानावर पोहोचतील. 

हार्बर रेल्वे

कुठे - पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 

कधी - सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम - ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरिता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपरच्या दरम्यान उपनगरीय रेल्वेसेवा वेळापत्रकानुसार धावणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :नववर्षमध्य रेल्वे