मध्य रेल्वेवर महाब्लॉक! प्रवाशांचे हाल, रस्तेही जाम; त्यात उकाड्याची भर, चाकरमान्यांची पुरती कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:29 PM2024-05-31T12:29:16+5:302024-05-31T12:30:06+5:30

Mumbai Mega Block: मध्य रेल्वेवर आजपासून तीन दिवस महामेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

Mega block on Central Railway passengers stuck roads also jammed In addition to the heat | मध्य रेल्वेवर महाब्लॉक! प्रवाशांचे हाल, रस्तेही जाम; त्यात उकाड्याची भर, चाकरमान्यांची पुरती कोंडी

मध्य रेल्वेवर महाब्लॉक! प्रवाशांचे हाल, रस्तेही जाम; त्यात उकाड्याची भर, चाकरमान्यांची पुरती कोंडी

मुंबई

मध्य रेल्वेवर आजपासून तीन दिवस महामेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेवर आज दिवसभरात एकूण १६१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे अंबरनाथ, बदलापूर, ठाणे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली आहे. शुक्रवारचा दिवस असल्यानं आज मेगाब्लॉकचा प्रवाशांवर परिणाम जाणवत आहे.

मध्य रेल्वेकडून आधीच या ब्लॉकची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी रस्ते मार्गाचाही अवलंब केल्याचं पाहायला मिळालं. यामुळे पूर्व द्रूतगती महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यात शहरातील तापमानाचा वाढलेल्या पाऱ्यानं घामाच्या धारांनी चाकरमानी वैतागले. अशी तिहेरी कोंडी मुंबईकरांची झाली आहे. 

मेगाब्लॉक कालावधीमध्ये ९३० लोकल फेऱ्यांसह ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे स्थानकात स्थानकात ६२ तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट मार्गावर ६२ तासांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर १२ तासांचा हा मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडलं आहे. 

कल्याण-डोंबिवलीकरांनी प्रवास टाळला
कल्याण डोंबिवली परिसरातून दर दिवस लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेनं प्रवास करतात. मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र, रेल्वेच्या आवाहनाला प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे. कल्याण स्थानकावर सकाळी नेहमीपेक्षा कमी गर्दी पाहायला मिळाली. तर डोंबिवली स्थानकातही गर्दी कमी होती. 

बेस्टकडून अतिरिक्त गाड्या
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बस चालवण्यात येत आहेत. ३१ मे रोजी रात्री १२:३० पासून २ जून दुपारी १२:३० पर्यंत नियमित बस फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त सेवा देण्यात येत आहे. यामध्ये बेस्टकडून ५५ अतिरिक्त बसगाड्यांच्या ४८६ अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेस्टतर्फे बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची गर्दीच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Mega block on Central Railway passengers stuck roads also jammed In addition to the heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.