Join us  

मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 7:07 PM

Mega Block on Central Railway: मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई - मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी  ४.४० पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०.५० ते दुपारी ३ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा दरम्यान थांबतील. माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

सीएसएमटी येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे / गोरेगाव येथे जाणाऱ्या / सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्ला-पनवेल दरम्यान ब्लॉक कालावधीत २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. डाउन जलद  ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर असून, सीएसएमटी येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर असून, सीएसएमटी येथून दुपारी ३.०३ वाजता सुटेल. डाउन हार्बर१) ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल.२) गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल.३) ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटी येथून सायंकाळी ४.५१ वाजता सुटेल.४) ब्लॉकनंतर वांद्रेसाठी पहिली लोकल सीएसएमटी येथून दुपारी ४.५६ वाजता सुटेल. अप हार्बर१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सुटेल.२) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.३) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.२८ वाजता सुटेल.४) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ४.५८ वाजता सुटेल.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमध्य रेल्वेमुंबई